आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रविरोधी कारवाया:बृहन्मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हँड ग्लायडर हॉट एअर बलून यांच्या वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. १२ डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू असल्याचे पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांनी कळवले आहे. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरिता हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...