आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापे:अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई-ठाण्यात छापे; 4 अटकेत, एका अल्पवयीन मुलीलाही घेतले ताब्यात

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने शनिवारी सायंकाळी सुरू केलेली ही छाप्यांची कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरूच होती.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि ठाणे येथे तीन ठिकाणी छापे टाकून विविध अमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

एनसीबीने शनिवारी सायंकाळी सुरू केलेली ही छाप्यांची कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरूच होती. या कारवाईत एनसीबीने १६५ ग्रॅम मेफेड्रोन, एलसएडीचे २० ब्लाॅटस, एमडीएमए/एक्टॅसीच्या ८ ग्रॅमच्या गोळ्या हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबईतील माहीम आणि अंधेरी तसेच शेजारच्या ठाणे येथे ही कारवाई करण्यात आली. मार्क डिकोस्टा, अब्दुल कादीर, नाझिया शेख, इम्रान शेख अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. काही जणांकडे अमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीने आता नवी मोडस ऑपरेंडी तयार केली असून त्यात तस्करीसाठी अल्पवयीन मुलींचा वापर केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...