आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Drugs Party Case| NCB Released Three Other Suspects In Drugs Case After BJP Phone Calls, Claims NCP Leader Nawab Malik In PC Latest News And Updates

मोठा खुलासा:भाजपच्या सांगण्यावरून NCB ने 3 जणांना सोडून दिले, क्रूझ पार्टी प्रकरणात 8 नव्हे 11 जणांना पकडले होते; नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूझ पार्टीमध्ये ड्रग्स प्रकरणी केवळ 8 जण पकडले गेले नव्हते. यात आणखी 3 जण होते. परंतु, भाजपच्या सांगण्यावरून त्यांना सोडून देण्यात आले असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत हा मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, भाजपच्या सांगण्यावरून NCB ने 3 जणांना सोडून दिले.

11 जणांना झाली होती अटक
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या NCB च्या कारवाईवर नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केले. एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी छापेमारी केली. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या 8 ते 10 नव्हती. त्यावेळी एकूण 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी नेत्याचा मेहुणा सुद्धा होता.

8 जणांवरच एफआयआर का?
मलिक पुढे बोलताना म्हणाले, अटक तर 11 जणांना झाली होती. परंतु, जेव्हा एफआयआर दाखल करण्यात आला तेव्हा फक्त 8 जणांची नावे टाकण्यात आली. उर्वरीत तीन जणांना 2 तासांत भाजपच्या सांगण्यावरून सोडून दोण्यात आले. ऋृषभ सचदेवा, प्रीतक गावा, अमीर फर्निचरवाला अशी त्या तिघांची कथित नावे होती. नवाब मलिक यांनी दावा केला की ऋृषभ सचदेवा भाजयुमोचे माजी नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत आपला दावा सिद्ध करण्यासाठी काही फोटो दाखवले. त्यातील स्क्रीनशॉट.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत आपला दावा सिद्ध करण्यासाठी काही फोटो दाखवले. त्यातील स्क्रीनशॉट.

मुंबई पोलिसांनी सत्य समोर आणावे -मलिक
मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर देखील आरोप केले. समीर यांना दिल्लीपासून महाराष्ट्राच्या अनेक भाजप नेत्यांनी फोन केले. तसेच या तिघांना सोडून देण्यासाठी सांगितले. यानंतर समीर वानखेडे यानी त्या तिघांची अर्ध्या रात्री सुटका केली असा दावा सुद्धा मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात समीर वानखेडे यांचे फोन रेकॉर्ड काढून आणि सीसीटीव्ही फुटेज खांगाळून सत्य समोर आणावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...