आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तब्बल 1400 कोटींचे ड्रग्ज जप्त:नालासोपारा भागात रसायनशास्त्र पदवीधराच्या कारखान्यात पोलिसांची कारवाई

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर जिल्ह्यात नालासोपारा भागात मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोन(म्यांव म्यांव) अमली पदार्थाचा ७०१.७४० किलो एवढा प्रचंड साठा जप्त केला. त्याची किंमत १४०३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थांचा हा सर्वात मोठा साठा आहे.

गोवंडी येथील एका ड्रग दलालास वरळी पोलिसांनी मार्च महिन्यात अटक केली होती. त्याच्याकडून २५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गोरखधंद्यात आणखी काही लोक सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक महिलेसह दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून २.७६० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.

अमली पदार्थ बनवण्याचा कारखानाच उघडला
अमली पदार्थ बनवणारा ५२ वर्षीय म्होरक्या रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेला आहे. अनेकविध प्रयोग केल्यानंतर तो मेफेड्रोन बनवणे शिकला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याने अमली पदार्थाचा कारखानाच उघडला, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...