आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगांनी वाटचाल बदलली:मान्सूनचे एक टोक 11 दिवसांपासून कर्नाटकात अडकले, महाराष्ट्रात 20 टक्के भाग मान्सूनने व्यापला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनने वाटचाल बदलली असून याचे एक टोक कर्नाटकात ११ दिवसांपासून अडकून पडले आहे. दुसरे टोक वेगाने मुंबईला ओलांडून गुजरात सीमेपर्यंत पोहोचले आहे. साधारण या टप्प्यात मध्य प्रदेशातील काही भागांत पाऊस सुरू होतो. परंतु यंदा चित्र वेगळे आहे. मान्सूनने फक्त केरळ व्यापला आहे. वास्तविक १२ जूनपर्यंत आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्रासह छत्तीसगडपर्यंत मान्सून दाखल झालेला असतो. या वेळी मात्र ढगांनी चाल बदलली असून कर्नाटकात मुक्काम वाढवला आहे.

या जिल्ह्यांत १५ पर्यंत पावसाचा यलो अलर्ट
अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

वीज पडून मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू
मराठवाड्यात शनिवारी वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला. यात सावखेडा (ता. सिल्लोड) येथील संजय नथ्थू उटाडे (४५), गजानन हरिश्चंद्र दराडे (२७, केकत जळगाव, ता. पैठण), गंगाबाई पांडुरंग जाधव (कोदा, ता. भोकरदन), अनिल भारत शिंदे (२२, पेवा, ता. मंठा), वसंत वामनराव जाधव (५०, माळकिणी) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात २० टक्के भाग मान्सूनने व्यापला
शनिवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे तसेच डहाणू व पुणे भागात मान्सून दाखल झाला असून त्याने राज्याचा २० टक्के भाग व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्याप ३-४ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागात पाच दिवस मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जाहीर केला असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील शास्त्रज्ञ सुषमा नायक यांनी दिली.

वातावरण योग्य पण जोर नसल्याने विलंब
मान्सूनच्या प्रवासासाठी योग्य वातावरण असले तरी त्यामध्ये जोर नसल्याने मान्सूनला विलंब होत आहे. तसेच नाशिकमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी १३ किंवा १४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर धुळे, जळगाव, नगर, सांगली, मराठवाडा या परिसरात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...