आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पावसाचे थैमान:समुद्राचे पाणी दुकान आणि घरांमध्ये शिरले, पाण्यात गाड्या अडकल्याने ईस्टर्न फ्री-वेवर गाड्या सोडून पळाले लोक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे, कुलाबासारख्या परिसरात पावसाने 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे

सोमवारी रात्रीपासून मुंबईत पावसाने थैमान घातले आहे. मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफच्या 5 टीम सातत्याने लोकांना वाचवण्याचे काम करत आहे. उंच लाटांमुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे. समुद्राचे पाणी लाटांसह घरात आणि दुकानांमध्ये शिरताना दिसत आहे.

हा फोटोही मुंबईच्या कुलाबा देवी परिसरातील आहे. समुद्राचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली
हा फोटोही मुंबईच्या कुलाबा देवी परिसरातील आहे. समुद्राचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली

मुंबईच्या कुलाबादेवी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. एका व्हिडिओमध्ये लोक पाण्यांच्या लाटांमध्ये जीव वाचवण्यासाठी ओरडताना दिसत आहे. दरम्यान गुरुवारीही या परिसरात पावसाचे पाणी तुंबलेले आहे. समुद्रात लाटा येण्याची शक्यता पाहता वाहतूक थांबवण्यात आली आहे.

रस्त्यांवर गाड्या सोडून गेलेले लोक आज सकाळीच आपल्या कार शोधत आहे. माहितीनुसार अनेक गाड्या या गायब झाल्या आहेत.

रस्त्यावर गाड्या सोडून गेले लोक
रस्त्यावर गाड्या सोडून गेले लोक

मुंबईमध्ये बुधवारी एवढा जास्त पाऊस झाला की, गेल्या 46 वर्षांचा विक्रम मोडला. पावसामुळे एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली की, लोक ईस्टर्न फ्री-वेवर आपल्या गाड्या सोडून घरी निघून गेले. ईस्टर्न फ्री-वे दक्षिण मुंबईच्या चेंबूर परिसराशी जोडला जातो. पाणी एवढे होते की, लोक आपली कार रस्त्यांवर सोडून घरी गेले.

कुलाबा देवी पसिरसात दूर-दूरपर्यंत केवळ पाणी दिसत आहे. रस्ते गायब झाले आहेत.
कुलाबा देवी पसिरसात दूर-दूरपर्यंत केवळ पाणी दिसत आहे. रस्ते गायब झाले आहेत.
तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बुधावारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास क्रेन कोसळली.
तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बुधावारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास क्रेन कोसळली.
बातम्या आणखी आहेत...