आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपक चहर, स्टाेक्स घेणार माेठा ब्रेक; चेन्नई अडचणीत:दुखापतीमुळे दाेन्ही खेळाडूंचा निर्णय जाहीर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेला चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आता यंदाच्या आयपीएलमध्ये जायबंदी खेळाडूंमुळे अडचणीत सापडला आहे. संघाचे दाेन आघाडीचे खेळाडू आता आठवडाभराची विश्रांती घेणार आहेत. यामध्ये आॅलराउंडर दीपक चहर आणि बेन स्टाेक्सचा समावेश आहे. यामुळे या दाेघांच्या अनुपस्थितीत चेन्नई संघाला आगामी सामन्यांत खेळावे लागणार आहे. ३० वर्षीय दीपक चहर हा यंदा चेन्नई संघासाेबत १४ काेटी रुपयांत करारबद्ध झाला आहे. मात्र, त्याला आता खेळताना गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला यातून सावरण्यासाठी जवळपास चार ते पाच सामन्यांना मुकावे लागणार आहे. याच दीर्घ विश्रांतीनंतर त्याचा आयपीएलमध्ये पुन्हा खेळण्याचा मार्ग सुकर हाेणार आहे. दुसरीकडे १६.२५ काेटींत करारबद्ध झालेल्या स्टाेक्सच्या पायाला दुखापत झाली. यामुळे त्याला आठवडाभराची विश्रांती देण्यात आली. यामुळे आता स्टाेक्स हा १७ एप्रिल राेजी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघाला आता आगामी सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान राॅयल्सच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. १२ एप्रिल राेजी हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील.