आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:मंत्री धनंजय मुंडे - हसन मुश्रीफांच्या बेपर्वाईमुळे ऊसतोड मजुरांची कोंडी; पंकजा मुंडे यांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडेंचा प्रश्न - मजुरांना संसर्ग नसताना गावी का येऊ देत नाहीत ?

एकाही ऊसतोड मजुराला कोरोनाचा संसर्ग नाही मग त्यांना गावी का परतू दिले जात नाही, असा सवाल करून लाॅकडाऊनदरम्यान ऊसतोड मजूर मध्येच फसण्यास अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बेपर्वाईमुळे मुजरांची कोंडी झाल्याचा आरोप माजी ग्रामविकास मंत्री व ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी केला. 

पंकजा यांनी मौन सोडून ऊसतोड मजुरांची लाॅकडाऊन काळातील दयनीय स्थिती कथन केली. त्या म्हणाल्या, २१ दिवसांचा लाॅकडाऊन पार पडला आहे. म्हणजे यात एकही मजूर कोरोना संसर्गाचा सापडला नाही. मग, त्यांना त्यांच्या गावी का परतू दिले जात नाही. त्यांची लेकरंबाळे मात्र गावी आहेत. त्यांचा कोण सांभाळ करणार? गावेच्या गावे ओस आहेत. कोरोना संकटाची चाहुल लागली असताना ऊस गाळप तातडीने का बंद केले नाही? कारखाने बंद करण्यास का विलंब केला? ऊसतोड मजुरांच्या पाठवणीबाबत निर्णय का घेतला जात नाही? असे अनेक प्रश्न पंकजा यांनी उपस्थित केले. 

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसतोड कामगार

अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसतोड मजूर अडकले आहेत. बहुतांश ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यातील आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची जबबादारी मोठी होती. पण, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बेपर्वाईमुळे ऊसतोड मजुरांची कोंडी झाली आहे, असा आरोप पंकजा यांनी केला. दरम्यान, या मुद्यावरून काही दिवसांत राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

हे तर पुतना मावशीचे प्रेम : धनंजय मुंडेंचे उत्तर  

कोरोनामुळे अडकलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. लॉकडाऊनमुळे मजूर जेथे आहे तेथे त्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, काही मंडळी अशा कठीण प्रसंगातही राजकारण करीत असून ऊसतोड कामगारांबाबतचे त्यांचे हे प्रेम पुतना मावशीचे आहे. ऊसतोड कामगारांचा पुळका असता तर राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांकडून गाइडलाइन बदलून आणल्या असत्या, असे प्रत्त्युतर धनंजय मुंडे यांनी िदले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मात्र कौतुक 

मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चार-चार वेळा मंत्रिपदाचा अनुभव आहे. मग, ऊसतोड मजुरांविषयी निर्णय घ्यायला इतका विलंब का लावला जातो, असे त्यांनी विचारले. तसेच, प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री घेत नसतात असे सांगून उद्धव ठाकरे यांच्या कोरोना विरोधातील लढाईचे पंकजा यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...