आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

साथी हाथ बढाना:कोरोना काळात राज्यातील 17,715 बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बदल करा; छगन भुजबळ यांची मागणी

आॅनलाइन रोजगार मेळावे, महास्वयंम वेब पोर्टलच्या साहाय्याने राज्यात गेल्या तीन महिन्यांत १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या, रोजगारावर गंडांतर आले होते. गेल्या तीन महिन्यांत राज्याच्या कौशल्य विकास विभागाने जिल्हा पातळीवर तसेच विभागीय पातळीवर ऑनलाइन रोजगार मेळावे भरवले होते. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे.

रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महास्वयंम वेब पोर्टल सुरू केले. त्यावर आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यांत राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाइन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. तीन महिन्यांत २४ ऑनलाइन मेळावे झाले आहेत.

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी
एप्रिल ते जून १ लाख ७२ हजार १६५ नोंदणी

मागील ३ महिन्यांत एप्रिल ते जूनअखेर महास्वयंम वेब पोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६०, तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इच्छुकांनी नोंदणी केली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बदल करा; छगन भुजबळ यांची मागणी
मुंबई | केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतर मागास प्रवर्गाचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात केला गेला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींवर अन्याय होत आहे. या कार्यक्रमात बदल करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इमाव प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्गात समाविष्ट केला आहे. त्यामुळे या योजनेत लाभार्थींना स्वत:ची गुंतवणूक १०% करावी लागते.

१६७ उद्योजकांचा सहभाग
आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे.582 उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून रोजगार मिळवून दिला.

१७ हजार १३३ जणांना रोजगार : यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळवण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार २२, तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे.