आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांना दिलासा:दिवाळी सणाच्या सुटीमध्ये राज्यभरात एसटीच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दि. 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन

दिवाळीनिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने दि. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकांवरून सुटणार असून त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बसफेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...