आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र:लॉकडाऊन कालावधीत राज्यात 49 हजार 756 गुन्हे दाखल, 10 हजार व्यक्तींना अटक तर 32 हजार वाहने जप्त

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद

राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च-17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10 हजार 276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32 हजार 24 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलिस विभागाच्या 100 नंबर वर 70 हजार 307 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

7 अधिकारी व 23 पोलिसांना बाधा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी व 23 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद  झाली असून  यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...