आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूकंप:पालघरमध्ये 3.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; एका वर्षांत पाचव्यांदा आला भूकंप, सुदैवाने जीवित किंवा वित्त हानी नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर भूकंपाचा नकाशा राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने जाहीर केला.
  • जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशमधील अलिगड येथेही सकाळी 6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले

मागील अनेक दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गुरुवारी रात्री 12 वाजून 26 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी मोजली गेली. अर्ध्या रात्री भूकंपाचे धक्के जाणवताच लोक आपल्या घरातून बाहेर पडले होते. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले.  

यासह जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये सकाळी 6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. 

पालघरमध्ये एका वर्षांत पाचव्यांदा आला भूकंप

प्रशासनाने लोकांना जागरुक राहण्यास आणि अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. पालघरमध्ये मागील एका वर्षात पाचव्यांदा भूकंप आला. याशिवाय देशात ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, मणिपूर, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेशात भूकंपाचे वारंवार धक्के बसत आहे.

जम्मूमध्येही आज भूकंप झाला

शुक्रवारी सकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी जम्मू-काश्मीरच्या कटरापासून 89 किलोमीटर पूर्वेकडे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3 होती. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हिमालयाच्या सभोवतालच्या भूभागाखाली बरीच उलथापालथ होत आहे. आणि त्यामुळे भूकंप येत आहेत. सोबतच वैज्ञानिकांनी मोठ्या भूकंपाचा इशारा देखील दिला आहे.