आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांंवर टीकेची झोड:खा. नवनीत राणांनी गणेशमूर्ती काही उंचीवरुन पाण्यात फेकल्याने रोष

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाचे शुक्रवारी मोठ्या थाटात विसर्जन केले. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गणेशाची मूर्ती काही फुटांवरून पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘हेच का तुमचे हिंदुत्व,’ असा सवाल शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला आहे. मात्र, नवनीत राणा यांनी आधी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेतली व नंतर ही गणेश मूर्ती काही उंचावरून खाली फेकली. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी खासदार राणांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...