आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळ घोटाळा प्रकरण:खा. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेला आता महिना उलटून गेला आहे. १ ऑगस्ट रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. या कोठडीत वाढ केली जावी, अशी मागणी ईडीने केली होती. ईडीने केलेल्या मागणीनुसार संजय राऊतांची कोठडी आणखी १४ दिवसांनी (१९ सप्टेंबरपर्यंत) वाढवण्यात आली. आपल्यावर करण्यात आलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे सर्व आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले होते. राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत यांच्यावर सहआरोपी प्रवीण राऊत यांच्यासोबत कांदिवलीतील पत्राचाळ पुनर्विकास योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली.

बातम्या आणखी आहेत...