आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Economically, The Role Of Ews Reservation For The Poor Is A Decision In Line With Prime Minister's Sabka Saath And Sabka Vikas Stance Praveen Darekar

EWS आरक्षण गरिबांसाठी फायदेशीर:पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रेय मिळू नये म्हणून विरोध सुरू; भाजपचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक दृष्या गरीबांसाठी आरक्षणाची भूमिका घेतली होती, आता देशात आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण कायम राहणार आहे. पंतप्रधानाच्या सबका साथ अन् सबका विकास भूमिकेला साजेसा निर्णय असल्याचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थांना या निर्णयामुळे त्याच्या जीवनाचा सुखकर मार्ग मोकळा होणार आहे. हे आरक्षण मिळण्याआधी सर्वांचे भविष्य टांगणीला लागले होते. मात्र आता कोर्टाच्यानिर्णयामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधानाना श्रेय मिळू नये म्हणून विरोध - मुनगंटीवार

जात धर्म कोणतेही असो प्रत्येक कुटुुंबाला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून हे आरक्षण आधी होते. बुद्धीमान असूनही अनेकांना व्यवस्थेच्या आभावी मागे पडावे लागायचे, गरीबांच्या सन्मानासाठी पंतप्रधानांनी हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. याला कोर्टाने मान्यता दिली तर हे चांगलेच आहे. कोणताही जात धर्मातील गरीबाला याचे फायदा होणार आहे. 2004 मध्येही या आरक्षणाची चर्चा सुरू झाली होती.

त्यावेळी असलेल्या केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपले मत काय असे विचारले होते. मात्र काँग्रेसचे निर्णय लवकर होत नव्हते, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकर निर्णय घेतात. केवळ पंतप्रधानाना त्यांचे श्रेय मिळू नये म्हणून काही लोक विरोध करत आहे, असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला लगावला आहे.

कोर्टाचा निकाल काय?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसाधारण प्रवर्गातील 10 टक्के आरक्षण देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. 5 पैकी 3 न्यायाधीशांनी EWS आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाला घटनात्मक चौकटीचे उल्लंघन मानले नाही. म्हणजेच हे आरक्षण कायम राहणार आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांनी EWSच्या बाजूने निकाल दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...