आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून राऊतांच्या अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. याच घोटाळ्यातील पैशातून अलिबागमधील जमीनी खरेदी केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांवर केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका दिला आहे. अलिबागमधील एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. गोरेगाव झोपडपट्टी प्रकरणी प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यांनतर आता संजय राऊतांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.