आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलयांचीही ‘ईडी’कडून चौकशी, गुंड इक्बाल मिर्चीच्या पत्नीशी आर्थिक व्यवहार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सोमवारी मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. सीजे हाऊसप्रकरणी त्यांची चौकशी झाली. यापूर्वी ईडीने २०१९ मध्ये पटेल यांची १२ तास चौकशी केली होती. याच प्रकरणात ईडी पुन्हा चौकशी करत आहे. २०१९ मध्ये दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीच्या पत्नीसोबत आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीने पटेल यांना समन्स बजावले होते.

पटेल कुटुंबाची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला भूखंड देण्यात आला होता. तो वरळीतील नेहरू तारांगणसमोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस आहे. ईडीने सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथ मजला जप्त केला आहे. ही इक्बाल मिर्चीची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...