आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंना दणका:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी जावयाला ईडीने केली अटक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते.

भाजपचे माजीमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. हा खडसेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू राहिली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे हे महसूलमंत्री होते त्यावेळी भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावयाने खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले होते. याच प्रकरणामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमली होती. या समितीचा अहवाल मात्र विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेला नव्हता.

दरम्यान यापूर्वी भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजप नेते असणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. यानंतर एकनाख खडसेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आपण भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...