आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसूली प्रकरण:अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ, माजी गृहमंत्र्यांसह मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीचा समन्स

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयने नुकतेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या 12 ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली होती

100 कोटी वसुली प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे लागलेली सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीची पिडा अजूनही कायम आहे. ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. यावेळी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस वाढवत असल्याचे दिसत आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये सीबीआयने नुकतेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या 12 ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली होती. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश होता. आता त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी याचिका केली होती ही फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारकडून याचिका करण्यात आली होती ती देखील उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला होता. यासोबतच महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, यासोबतच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेतला होता. हा भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयालाकडे केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...