आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:‘ईडी’कडून मंत्री परब यांची 8 तास चौकशी, शंभर कोटी वसुली प्रकरणात ‘ईडी’ने बजावले होते समन्स

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ने समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता परब हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून तब्बल आठ तास परब यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी सात वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

यानंतर प्रसारमाध्यमांकडे मंत्री अनिल परब म्हणाले, ‘ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. ईडी ही एक अॉथोरिटी आहे, आणि अॉथोरिटीला उत्तरे देणे ही माझी जबाबदारी आहे. मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितले की, मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही.’

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल परब यांना ईडीने दोनदा समन्स बजावले होते. याआधी परब यांनी चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा परब यांना समन्स बजावले होते. त्यानंतर ते मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. दरम्यान, या प्रकरणात पाच वेळा समन्स बजावूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीकडे हजर झालेले नाहीत.

परब यांच्यावर आरोप काय ?
बीएमसीतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये आपल्याला केली होती, असा जबाब निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने ‘एनआयए’कडे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...