आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची 'पिडा':अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ, परिवहन मंत्र्यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे. यामुळे आता अनिल परबांच्या अडचणी वाढणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते. खरमाटे हे आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आहेत. त्यांना ईडीकडून आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने खरमाटे यांना हे पहिलेच समन्स बजावले आहे. गेल्या आठवड्यामध्ये अनिल परब यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते या चौकशीसाठी हजर झाले नव्हते. यानंतर आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या महिन्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. या छापेमारीमध्ये दरम्यान ईडीने काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली होती. यानंतर आता त्यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...