आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता भावना गवळींना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. परभणी येथील पाथरी याठिकाणी ईडीने मोठी कारवाई केली होती. यानंतर भावना गवळींचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक करण्यात आली होती. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे या कंपनीचे संचालक आहेत. यानंतर आता भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावला आहे.
या प्रकरणात सुरू आहे चौकशी?
वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली.
दरम्यान, 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली. भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.