आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू:ईडीकडून आता रियाच्या भावाची चौकशी, सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी व सीए रितेश शहालाही प्रश्नोत्तरे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिला तपास अहवाल

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीने शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीची चौकशी केली. शुक्रवारी रियाची ९ तास, तर शोविकची २ तास चाैकशी करण्यात आली होती. यासह सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी व सीए रितेश शहालाही प्रश्नोत्तरे करण्यात आली होती.

सुशांतच्या वडिलांनी रिया व तिच्या कुटुंबीयांवर मुलाच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. हे पाहता ईडी मनी लाँडरिंगच्या अंगाने तपास करत आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे आहे. सीबीआयने पाटणा एसआयटीसोबत बैठक करून प्रकरणाची माहिती घेतली आहे. रियाने सुप्रीम काेर्टात पाटण्यात सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेले प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.

रियाच्या फ्लॅटवर ईडीच्या टीमचा छापा

ईडीच्या एक टीमने शुक्रवारी रियाशी संबंधित खारमधील मालमत्तेची चौकशी केली. येथे रियाचा वन बीएचके फ्लॅट आहे. सूत्रांनुसार या फ्लॅटची किंमत जीएसटीसह सुमारे ८४ लाख रुपये आहे. रियाने तो २०१८ मध्ये बुक केला होता. त्यासाठी तिने ६० लाखांचे कर्ज घेतले होते.

महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिला तपास अहवाल

महाराष्ट्र सरकारने सुशांत प्रकरणातील तपास सीलबंद लिफाफ्यात सुप्रीम कोर्टाला सादर केला आहे. यात आतापर्यंतच्या तपासाचे विवरण आहे. सरकार लवकरच एक शपथपत्रही दाखल करू शकते. कोर्टात ११ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. रियाने बिहारमध्ये दाखल खटला मुंबईत हस्तांतरित करण्याचे अपील केले आहे. सुशांतचे वडील व बिहार सरकारने त्यावर कॅव्हेट दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...