आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवाब मलिक यांनी आज न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी सलाईन सुरू असताना जबरदस्तीने डिस्चार्ज करून घेतला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तर पिण्यासाठी पाणी देखील देण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नाही असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. आज मलिकांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे.
जे जे रुग्णालयात असताना अयोग्य वागणूक
जे जे रुग्णालयात असताना योग्य वागणूक दिली नाही असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केला आहे. मला कोणतीही कल्पना न देता सलाईन काढण्यात आले. तर पिण्यासाठी पाणी मागितले असता त्यातही हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यायालयीन कोठडीत असताना मलिकांची तब्बेत खराब झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलिकांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचा खुलासा मलिकांनी केला आहे. आता यावर न्यायालयाकडून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवाब मलिक यांना 20 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी करताना पीएमएलए कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली होती. खरेतर, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संलग्न मालमत्तांच्या खरेदीत पैशाच्या गैरवापराशी संबंधित आहे. ईडीच्या वकिलांनी यावेळी सांगितले की, 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहे.
याआधी राणा दाम्पत्याचा आरोप
राणा दाम्पत्याने अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप केला होता. आणि आम्ही मागसवर्गीय असल्याने मला पाणी दिले नाही, असा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. या संदर्भात त्यांनी लोकसभा सभापती यांना पत्र लिहले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांचा चहा घेतानाचा व्हिडिओ टविट करत हे सगळे खोटे असल्याचे सांगितले होते. आणि आता नवाब मलिक यांनी असा आरोप ईडी अधिकाऱ्यांवर केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.