आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीचा छापा:संजय राऊतांच्या जवळच्या दोन व्यक्तींवर ईडीचा छापा

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जवळच्या २ व्यक्तींच्या घरी छापे टाकले. मात्र, छापा पडलेल्या व्यक्तींची नावे आणि ठिकाणांची माहिती गुप्त ठेवण्यात आली. सोमवारी संजय राऊत यांना ईडीने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांनीच प्रवीण राऊत यांच्या आडून पत्राचाळ घोटाळा केल्याचे ईडीने विशेष न्यायालयात सांगितले. तसेच या प्रकरणात सखोल तपास करायचा असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत आणि प्रवीण यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रवीण यांना बेकायदेशीररीत्या मिळालेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये थेट संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबाला देण्यात आले होते. ही रक्कम जास्त असू शकते, असा दावा ईडीने केला आहे. एकूणच राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...