आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PMC बँक घोटाळा:ईडीने संजय राऊतांच्या पत्नीला पुन्हा बजावला समन्स, 11 जानेवारी रोजी चौकशीला बोलावले; सोमवारी झाली साडेतीन तास चौकशी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचा PMC बँकेच्या घोटाळ्याशी संबंध असल्याचा ईडीला संशय

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी 4 जानेवारी रोजी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. PMC बँक घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीच्या टीमने त्यांना 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या एक दिवस आधीच ईडीसमोर हजर झाल्या.

सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न विचारले गेले होते. ती आपल्याबरोबर अनेक कागदपत्रे घेऊन ईडी कार्यालयात गेल्या होत्या. त्याआधी ईडीने वर्षा यांना 4 वेळा समन्स बजावला होता. मात्र त्या एकदाच हजर झाल्या. वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचे पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे. दुसरीकडे . EDच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवला आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...