आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुख प्रकरण:गृहविभागाच्या उपसचिवाला ईडीची नोटीस, आजच चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता या प्रकरणासंबंधीत कथित मनी लॉण्ड्रिग प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याच्या गृहविभागाचे उप सचिव कैलाश गायकवाड यांना देखील समन्स बजावला आहे. आजच चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांना 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांनी केला होता. याच प्रकरणामध्ये आता कैलाश गायवाड यांना देखील समन्स बजावण्यात आला. त्यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील 'ईडी'ने आतापर्यंत पाच वेळा चौकशीचे समन्स बजावला आहे. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...