आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांना आणखी एक धक्का:नवाब मलिकांच्या अडचणींमध्ये वाढ, बंधू कप्तान मलिकांनाही ईडीने बजावले समन्स

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर नवाब मलिकांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. आता त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे.

एएनआय या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर ईडीने कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणातच ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिकांना समन्स बजावले आहे. मात्र मलिकांना याविषयी विचारणा केली असता त्यांना कोणतेही समन्स बजावले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मलिक कुटुंबियांना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. नवाब मलिक हे आम्हाला ववडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जामार आहोत. मला ईडीने कोणतीही नोटीस बजावली नाही.'

अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात ईडीचे पथक बुधवारी पहाटे साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी धडकले. ईडी कार्यालयात 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली. विशेष न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. कोर्टात ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचाही गंभीर आरोप केला आहे. ईडीने 14 दिवसांची त्यांची कोठडी मागितली, मात्र कोर्टाने 8 दिवसांची कोठडी दिली.

बातम्या आणखी आहेत...