आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचे समन्स:राऊत यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली; पत्नीच्या खात्यांची झाडाझडती सुरू

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चाैकशीसाठी समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी वाढवण्यात आली. ईडीने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गुरुवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली आहे.

ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का, असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला जिथे ठेवले तिथे हवा खेळती नाही. मात्र, संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यावर राऊत यांनी मी तो पाहिला नसल्याचे सांगितले.

वर्षा राऊतांचे आर्थिक व्यवहारांची तपासणी

याप्रकरणी त्यांना 1 ऑगस्टला पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले पण त्यांना पुन्हा कोठडी मिळाली असून यादरम्यान ईडी आर्थिक व्यवहारांचे तपास करणार आहे.

कोर्टाने ईडीला फटकारले

याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.

ईडीचे वकील : राऊतांच्या पत्नीकडून अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी करीत आहोत.

ईडीचे वकील : वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले.

न्यायाधीश: ईडीच्या तपासात अजून काही व्यवहार समोर आले आहेत.

मनोज मोहिते (राऊतांचे वकील) : राऊतांना जबाब नोंदवण्यासाठी धमकावले जात आहे. फक्त दोन आरोप राऊतांवर आहे पण त्यात आधीच चौकशी झाली. आता कोठडीची गरज नाही.

स्वप्ना पाटकर : संजय राऊतांकडून धमकावले जात आहे.

न्यायाधीश: राऊत अटकेत असतील तर ते कसे धमकावतील.

लाईव्ह अपडेट्स

  • 10 ऑगस्टपर्यंत कोठडी द्यावी अशी ईडीने मागणी केली होती.
  • सोमवारपर्यंत इतर लोकांची चौकशी करू-ईडी
  • राऊतांचे वकील मनोज मोहितेंकडून न्यायालयात युक्तीवाद

पुन्हा कोठडीच

गेल्या चार दिवसांत ईडीने संजय राऊतांची कडाडून चौकशी केली. त्यादरम्यानईडीला अनेक गोष्टी समजल्याचे कळते. त्यामुळे ईडीने आता राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडी न्यायालयात केली ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

बातम्या आणखी आहेत...