आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ईडीचे सत्र सुरुच असून अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने आज सकाळी 8 च्या सुमारास अडसूळ यांना समन्स पाठवले आणि चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले असे वृत्त माध्यम आणि सोशल मीडियावर पसरले.
ईडीने ताब्यात घेतले?
ईडीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेले जाणार होते. परंतु, ऐनवेळी त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना गोरेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्थातच माजी खासदार अडसूळ यांना ईडीने अद्याप ताब्यात घेतलेले नाही.
संपूर्ण प्रकरण काय?
अमरावती लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. हा वाद आता शिगेला पोहाचताना दिसत आहे. आमदार रवी रावा यांनी सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडे अडसूळ यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आमदार रवी राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
काय म्हणाले आनंदराव अडसूळ?
आमदार रवी राणा यांच्या प्रतिक्रियेनंतर आनंदराव अडसूळ म्हणाले की, 800 कोटींचा टर्नओवर असलेल्या बॅंकेत 980 कोटींचा घोटाळा कसा झाला. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे समजल्यानंतर मी स्वतः आर्थिक घोटाळे आणि बँकिंग फसवणुकीचा तपास करणाऱ्या संस्थेकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. यामध्ये आम्ही कोणीही सामील नाही आहोत, असे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.