आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:ईडी : सुशांतची बहीण मीतूने नोंदवला जबाब; माजी व्यवस्थापक श्रुतीची तिसऱ्यांदा चौकशी

मुंबई/नवी दिल्ली/पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मंगळवारी त्यांची बहीण मीतू सिंहचा जबाब नोंदवला. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, मीतूकडे सुशांतची मालमत्ता, त्यांच्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम, खात्यातील देवाण-घेवाण आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या तसेच रिया चक्रवर्तीसोबत त्यांच्या संबंधांबाबत विचारपूस करण्यात आली. सुशांतचा एखादा नातेवाईक पहिल्यांदाच चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाला.

मीतू मुंबईत राहते आणि १४ जूनला सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी वांद्रे येथील फ्लॅटवर आली होती. ईडीने सुशांतचा मित्र आणि सोबत राहणारा सिद्धार्थ पिठानी, सुशांत व प्रियाची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीची सलग दुसऱ्या दिवशी तिसऱ्यांदा चौकशी केली.

सुशांत मृत्युप्रकरणी पाटण्यात दाखल प्रकरण मुंबई स्थलांतरित करण्याच्या रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. न्यायालयाने सर्वांना गुरुवारपर्यंत लेखी उत्तर देण्याचे सांगितले आहे. प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करेल की सीबीआय याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल.

बातम्या आणखी आहेत...