आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी:1 ऑगस्टपासून होते ईडीच्या कस्टडीत; तूर्त आर्थररोड कारागृहात मुक्काम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज तिसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना कोर्टाने दिलासा दिला, त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात येणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

ईडी कोठडीदरम्यान काय झाले?

 • संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडे चौकशी करण्यात आली.
 • वर्षा राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
 • राऊतांच्या पत्नीकडून अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली गेली.
 • वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले त्याचे धागेदोरेही ईडीकडून तपासणी

ईडी तिसऱ्यांदा कोठडी मागणार

गेल्या चार दिवसांत ईडीने संजय राऊतांची चौकशी झाली. त्यादरम्यानईडीला अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे ईडीने आता राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडी न्यायालयात करणार आहे. तिसऱ्यांदा राऊत यांना ईडीचे अधिकारी कोठडी न्यायालयाकडे मागणार आहेत.

आधी पोलिस कोठडी मिळाल्यानंतर काय झाले?

 • अलिबागमधील जमीन खरेदीसाठी राऊतांनी 3 कोटी वापरले.
 • राऊतांनी अलीबागमध्ये 10 प्लाॅट खरेदी केली होती.
 • ईडीने दोन छापे मुंबईत टाकले तेव्हा 'एचडीआयएल' कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तींचा ईडीने जबाब नोंदवला.
 • या कंपनीच्या संबंधित दुसऱ्या व्यक्तीच्या घरीही ईडीने छापे टाकले होते त्यातून बरीच माहिती ईडीने गोळा केली आहे.
 • संजय राऊत यांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
 • राऊतांची ईडीसमोर चौकशी झाली पण ही चौकशी रात्री करण्यात आली नाही.
 • चौकशीदरम्यान राऊतांजवळ काही अंतर राखून त्यांच्या वकीलांनी थांबण्याची मुभा होती.
 • ईडीने चार दिवसांत राऊतांविरोधातील प्रबळ पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला.

हो मला त्रास आहे...

याप्रकरणी 4 ऑगस्टला न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.

राऊतांकडून झाली होती मागणी

संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात केली होती.

2024 पर्यंत देशात असेच चालणार : फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय; संजय राऊतांच्या अटकेवर खासदार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

यापूर्वी न्यायालयातील युक्तीवाद

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट संबंध असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय राऊत यांना जर सोडले तर ते पुन्हा तशा प्रकारचे कृत्य करू शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

पत्राचाळीमुळे अडचणींचा 'सामना'

 • विकलेल्या 1034 कोटींच्या एफएसआयचा हिशोब संजय राऊतांना द्यावा लागणार आहे.
 • प्रवीण राऊत, गुरू आशिषचे माजी संचालक
 • पत्राचाळ : 2006 मध्ये म्हाडा, गुरू आशिष बिल्डर आणि भाडेकरूंमध्ये करार झाला.
 • गुरू आशिष : 2007 मध्ये प्रवीण राऊत गुरू आशिषचा संचालक
 • प्रवीण राऊत : 1034 कोटींच्या एफएसआयच्या बेकायदा विक्रीचा ईडीकडून ठपका. आता कंपनीचा संचालक म्हणून प्रवीण राऊत सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहे.
 • माधुरी राऊत : प्रवीण राऊत यांची पत्नी - वर्षा राऊत : संजय राऊत यांची पत्नी (या दोघी सिद्धांत सिस्कॉन प्रा.लि कंपनीत भागीदार)
 • संजय राऊत : प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांच्या खात्यावर 1 कोटी 60 लाख जमा झाल्याचा ईडीचा आरोप. यातून अलिबागमध्ये प्लॉट घेतल्याचा दावा केला आहे.
 • ईडी : प्रवीण हा संजय राऊतांचा ‘फ्रंटमॅन’ असल्याचा आरोप करत 1034 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर ईडीकडून ठपका.

पत्राचाळीच्या ‘एफएसआय’चा घोटाळा

सिद्धार्थनगरात 47 एकरांवरील पत्राचाळीच्या विकसनासाठी म्हाडाने 2006 मध्ये राकेश व सारंग वाधवान यांच्या गुरू आशिष कंपनीशी करार केला. 20 मार्च 2007 रोजी प्रवीण राऊत कंपनीचा तिसरा संचालक बनला. 2008 पर्यंत घरे न दिल्याने भाडेकरूंची म्हाडाकडे तक्रार. 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाचे आदेश दिले. 2016 मध्ये कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. गुरू आशिषने 1034 कोटींचा एफएसआय अन्य बिल्डर्सना अवैधपणे विकल्याचे पुढे आले. संचालक म्हणून प्रवीण राऊत ईडीच्या कोठडीत. प्रवीणने संजय राऊतच्या पत्नी वर्षा यांना घर खरेदीसाठी दिलेले 55 लाख का व कशासाठी दिले, ते कोठून आले या प्रश्नापासून सुरू झालेला हा तपास आता 1034 कोटींवर आला आहे.

ईडीचा दावा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असल्याने प्रवीण यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) आवश्यक मान्यता मिळाली. मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रवीण यांना बेकायदेशीररीत्या मिळालेल्या 112 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 6 लाख रुपये थेट संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबाला देण्यात आले होते. ही रक्कम जास्त असू शकते, आतापर्यंतच्या तपासात असा दावाही ईडीने केला आहे.

राऊतांच्या घरी साडेअकरा लाख सापडले

रविवारी संजय राऊत यांच्या घराची झडती घेतली असता, ईडीला 11.50 लाख रुपये रोख सापडले होते. राऊत किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या रकमेचा स्रोत सांगता आला नाही. ईडीने तपासात ही वसुली नोंदवली आहे. पत्रा चाळ घोटाळा 1043 कोटी रुपयांचा आहे. राऊत हे या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.

राऊतांची ईडीकडून 9 तास चौकशी

ईडीने रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची 9 तास चौकशी केली. ईडीचे पथक सकाळी सात वाजता भांडुप येथील त्यांच्या मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. 10 अधिकाऱ्यांनी राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांच्या खोल्यांची झडती घेतली. टीमने त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला 27 जुलै रोजी समन्सही बजावण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नाही.

राऊत यांचा दादरमधील फ्लॅट सील

ईडीने रविवारी राऊत यांचा दादरमधील फ्लॅट सील केला होता. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून संजय राऊत यांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

एवढी केली संपत्ती जप्त

हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

काही भाग बिल्डरांना विकला

रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी ६७२ सदनिका येथे पूर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग इतर बिल्डरांना विकण्यात आला.

पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासात उघडकीस आले प्रकरण

2020 मध्ये महाराष्ट्रात उघड झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच प्रवीण राऊत यांच्या बांधकाम कंपनीचे नाव समोर आले. त्यानंतर बिल्डरच्या पत्नीच्या बँक खात्यातून संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती मिळाली. या पैशातून संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...