आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • ED's Notice Is Not A Death Warrant For Political Leaders But A Love Letter, Sanjay Raut's Taunt On Central Government After Notices To Shiv Sena Leaders

राऊतांचा केंद्राला टोला:ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र, शिवसेना नेत्यांना आलेल्या नोटिसीनंतर संजय राऊतांचा टोला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी हा भाजपच्या कार्यालयामध्ये काम करत आहे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राणे यांची अटक आणि जामीन या घटना घडल्या. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परबांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे असे नोटीशीत म्हटले आहे. त्याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'ईडीकडून मिळालेली नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांनंतर आता अशा प्रेमपत्रांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. अनिल परब यांना भाजपच्या नेत्यांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करणार आहेत.' पुढे भाजपला टोला लगावत राऊत म्हणाले की, 'एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी हा भाजपच्या कार्यालयामध्ये काम करत आहे'

बातम्या आणखी आहेत...