आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हरपले छत्र:कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मागणी; प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक मदत सूरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन, प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोनामुळे महाराष्ट्रात आजपर्यंत 92 हजार 225 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक मुले अनाथ झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात इ.1 ली ते 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कोविडमुळे मृत्यू पावल्याच्या घटना घडत असताना या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आज मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे पालक मृत पावल्यामुळे विद्यार्थ्यांचे छत्र हरवल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे गोर गरीब, शोषित, वंचित पिडीत विद्यार्थ्यांना मदत करून आधार देणे व स्वावलंबनाने आयुष्या मध्ये पुन्हा उभा राहण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे असल्याचे मत मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मृत पावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे. या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सूरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत शिशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत देखील चर्चा केली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत

बातम्या आणखी आहेत...