आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरात इयत्ता 12 वीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले आहे. सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटी परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार याकडे लागले होते. तंत्र शिक्षण विभागाने सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून राज्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान ही पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टोबरनंतर सुरू होईल असेही सामंत म्हणाले. तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येतात.
राज्यभरात 8 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
राज्यभरात लाखो विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार असून यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सर्व परीक्षा केंद्रांना कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करत परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यभरातील 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देतील. यासाठी राज्यात 226 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
राज्यात महाविद्यालये कधी सुरु होणार
पत्रकार परिषदेदरम्यान, अनेक पत्रकारांनी राज्यातील महाविद्यालये कधी सुरु होईल याबाबत विचारले. यावर बोलताना सामंत म्हणाले की, सीईटीची परीक्षा झाल्यानंतर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये 10 ऑक्टोबरनंतरच सुरु करण्यात येणार आहे. परंतु, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.