आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदर वाढण्याचा परिणाम...:कर्ज घेण्याचा वेग मंदावला, बचतीत वाढ

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात व्याजदर वाढण्याचा परिणाम बँकांमध्ये दिसून येत आहे. याआधीच्या तुलनेत कर्जाची विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ काहीशी घटल्याचे दिसून येते. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, दुसऱ्या पंधरवड्यात देशात एकूण २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. ही रक्कम ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात वाटप केेलेल्या कर्जापेक्षा(२४ हजार कोटी रु.) थोडी जास्त आहे. बँकांच्या बचत खात्यांमध्ये जमा होणारी रकमेत अनेक पट वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांत जमा रकमेत १.६९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही संख्या यामुळे चकित करते की, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात बँकांत जमा एकूण रकमेत ६० हजार कोटी रुपयांची घट आली. रिझर्व्ह बँकेनुसार, ४ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या बँकांत एकूण १७४ लाख कोटी रु. जमा होते. २१ ऑक्टोबरला ही रक्कम १७२ लाख कोटी रु. होती. याच पद्धतीने ४ नोव्हेंबरपर्यंत एकूण कर्ज १.२८६ लाख कोटी रु.होते. २१ ऑक्टोबरपर्यंत १.२८६ लाख कोटी रु. होते. रिझर्व्ह बँकेनुसार, गेल्या २आठवड्यांत बँकांत जमा केली जाणारी रक्कम कर्जाच्या तुलनेत चौपट जास्त वाढली आहे.एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही आठवड्यांत एकरकमी ठेवीवर व्याजदर १ ते १.५% पर्यंत वाढले. या प्रमाणात कर्जाचे व्याजदरही वाढले. त्याचा परिणाम बँकांत रक्कम जमा करण्याचा ट्रेंड परतत आहे.

बँकांमध्ये जमा रक्कम १.६९ लाख कोटी रु. वाढली असा बदलला ट्रेंड दुसरा पंधरवडा (अॉक्टो.) पहिला पंधरवडा {जमेत वाढ + 1.69 लाख कोटी - 60 हजार कोटी {एकूण कर्ज वाटप + 29 हजार कोटी + 24 हजार कोटी

बातम्या आणखी आहेत...