आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2023:समाजातील लहानात लहान घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न; मध्यावधीची नांदी तर नाही ना?

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या अगदी लहानात लहान घटकाला समावून घेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेला असून आणखी महामंडळांच्या निर्मितीची घाेषणा, यापुढे पिकांचे पंचनामे, माेजणी ड्रोनद्वारे यांसारख्या घाेषणा तंत्रज्ञानाकडे वेगाने वाटचाल सुरू हाेत असल्याचे द्याेतक आहेत. हा नियमित अर्थसंकल्प असला तरी इतक्या प्रिय घाेषणांमुळे हा मध्यावधी निवडणुकीच्या तांेडावरील अर्थसंकल्प आहे की काय? असा प्रश्न नक्कीच पडताे. खऱ्या अर्थाने या सगळ्या घाेषणा अंमलात आल्या, प्रशासनाने त्या तितक्यात जाेरकस राबवल्या तर सर्वसामान्यांसाठी हा अतिशय चांगला अर्थसंकल्प ठरू शकताे.

अर्थसंकल्प सादर करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृताची अभिनव कल्पना साकारली. पहिल्या अमृतामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अनेक उपाययाेजनांचा उहापाेह केला. २९,१६३ काेटी रुपयांची तरतूद केली आहे. आज सर्वसामान्य शेतकरी त्रस्त असून त्याला दिलासा मिळेल असे दिसते. दुसऱ्या अमृतात महिलांना केंद्रबिंदू ठेवून एसटी भाड्यात ५० टक्के सवलत, महिलांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात उद्याेगांचे क्लस्टर, नाेकरदार महिलांसाठी ५० नवी वसतिगृहांसारख्या याेजना असून ४३,०४६ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिसरे अमृत म्हणजे, रस्ते, हवाइसेवा, उड्डाणपूल, जलवाहतूक, थाेडक्यात पायाभूत सुविधांवर भर देऊन महाराष्ट्राला थ्री ट्रिलीयन इकाॅनाॅमीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची उभारणी, सशक्तीकरणावर भर दिला गेला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते कसे निर्माण करता येतील यावर लक्ष केंद्रित केले असल्याने अर्थचक्र निश्चित फिरेल. तृतीय अमृतात ५३,०५८ काेटी रुपयांची तरतूद आहे. चतुर्थ अमृतामध्ये राेजगार निर्मिती, सक्षमीकरण, लाॅजिस्टिक धाेरणावर भर असून केंद्र सरकारने मांडलेल्या सर्क्युलर इकाॅनाॅमी पार्कच्या संकल्पनेला पूरक धाेरण ठेऊन राज्यात सहा ठिकाणी असे पार्क उभारण्याची घाेषणा केली आहे. टेक्निकल स्किल्ड मॅन पाॅवरच्या दृष्टीने स्टाॅफ ऑफ एक्सलन्सची तरतूद आहे. पर्यटनातून पाचशे जणांना प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण देऊन राेजगार निर्मितीचा उपक्रम महत्वाचा आहे. चाैथ्या अमृतामध्ये ११६५८ काेटींची तरतूद आहे. पंचामृतातील पाचव्या अमृतात साैरऊर्जा व पवनऊर्जा निर्मितीवर भर आहे. विशेष म्हणजे, १६ हजार काेटींची तूट असल्याचे सांगतांनाच ही तूट ३ टक्कयांपेक्षा कमी असावी, किंबहुना ही तूट त्यापेक्षा कमी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, लाेकाभिमूख अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लाेकांकडून सूचना मागविल्या हाेत्या. ४० हजार सूचना आल्या आणि त्याचा अंतर्भाव या अर्थसंकल्पा केला गेला आहे. भाग-२ मध्ये महिलांकरिता व्यवसाय करात ज्यांचे उत्पन्न २५ हजारांपर्यंत त्यांना सूट देण्यात आली आहे. व्यापार-उद्याेगांची जी मागणी हाेती, त्यानूसार व्हॅटमध्ये अभय याेजनेसाठी १ मे ते ३१ ऑक्टाेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या तरतूदी मनलाेभन करणाऱ्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात येणेही तितकेच महत्वाचे आहे.

{ संताेष मंडलेचा, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर

बातम्या आणखी आहेत...