आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात कोरोना संक्रमणावर उपचार करत असलेल्या 8 लोकांचा मृत्यू फंगल इन्फेक्शन (म्यूकॉरमाइकोसिस) ने झाला आहे. याला ब्लॅक फंगसही म्हटले जाते. एका सीनियर अधिकाऱ्याने सांगितले की, अशा जवळपास 200 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अँड रिसर्चचे अध्यक्ष तात्याराव लहाने यांनी पीटीआयला सांगितले की, अशा प्रकारची प्रकरणे आता वाढत आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून आलेल्या 200 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. यामधील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. डॉ. लहाने यांनी सांगितले की, मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोना संक्रमित होते. फंगल इन्फेक्शनने त्यांची इम्यून सिस्टम कमजोर केली होती.
कोणत्या लोकांवर ब्लॅक फंगसचा धोका जास्त
झपाट्याने वाढत आहेत कोरोना प्रकरणे
डॉक्टर लहाने म्हणाले आहेत की, हे फंगल इन्फेक्शन जुने आहे. परंतु कोरोना रूग्णांमध्ये त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णाच्या उपचारात वापरल्या जाणार्या स्टिरॉइड्समुळे रूग्णाची शुगर लेव्हल वाढते. या व्यतिरिक्त काही औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती देखील दाबण्याचे काम करते. अशा परिस्थितीत, रुग्णाला सहजपणे हे फंगल इंफेक्शन होते. हे संक्रमित व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो. काही प्रकरणांमध्ये, रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी एक डोळा कायमचा काढावा लागतो.
ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांना जास्त धोका
यापूर्वी निती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी शुक्रवारी म्हटले होते की, म्यूकॉरमाइकोसिस एक प्रकारचे फंगस आहे, जे ओल्या पृष्ठभागावर आढळते. त्यांनी म्हटले होते की, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले जाते. त्यामध्ये ओलावा असतो. यामुळे इन्फेक्शन वाढण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात 54 हजारांपेक्षा जास्त संक्रमित
महाराष्ट्रात शुक्रवारी 54,022 लोक संक्रमित आढळले. 37,386 लोक रिकव्हर झाले आणि 898 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 49.96 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 42.65 लाख लोक बरे झाले आहेत. तर 74,413 लोकांचा मृत्यू झाला. 6.54 लाख रुग्णांवरही सध्या उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.