आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:उमेदवारीबाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे, एकनाथ खडसे समजुन घेतील- चंद्रकांत पाटील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षातील मोठ्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे

येत्या 21 मे ला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक होणार आहे. दरम्यान, भाजपकडून विधानसभेत डच्चू दिलेल्या नेत्यांना यंदाही डावलण्यात आले. भाजपने विधानपरिषदेच्या चार जागांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांच्या नावावर शिक्कामोतर्ब झाला आहे. त्यानंतर भाजपमधून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रीया

दिली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने 4 उमेदवार घोषित केले. चारही जणांनी आज अर्ज भरले आहेत. भाजपमधील इच्छुकांची नावे आम्ही केंद्राकडे पाठवली होती. दिल्लीत उमेदवार पार्शवभूमी सांगितली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. केंद्राने आगामी काळासाठी या नेत्यांचा विचार केला असेल,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 'एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काहीतरी विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत. हे तिघेही समजूतदार आहेत, स्वतःच स्वतःला समजावून सांगतील. यापूर्वीही इच्छुकांना तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसेंनी अनेकांची समजूत काढली आहे, त्यामुळे ते आता स्वतःही समजून घेतील', असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...