आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाथाभाऊ राष्ट्रवादीत:चाळीस वर्षे राजकारण केले पण बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलेले नाही, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय जनता पक्ष जसा वाढवला त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढू असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दिला आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र साधले आहे. मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करत आहे पण मी बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलेले नाही असा टोला एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश दिला याबद्दल मी शरद पवारांचा आभारी आहे. भाजपमध्ये माझी किती छळवणूक झाली, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मी माझा गुन्हा काय आहे हे विचारले. काही गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्रे द्या. पण या प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही. मी खूप संघर्ष केला आहे. राजकारणात संघर्ष खूप करावा लागला.'

तसेच देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत खडसे म्हणाले की, मी पाठीत कधीच खंजीर खुपसलेला नाही. समोर गोड बोलायचे मागे खंजीर खुपसायचा असा माझा स्वभाव नाही. मी चाळीस वर्षे राजकारण केले पण बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलेले नाही. कुणाला समोर ठेवून आरोप करणे हा माझा स्वभाव नाही.

एकनाथ खडसे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. यावरुनच एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना चाळीस वर्षे राजकारण केले पण बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलेले नाही असा टोला लगावला आहे.