आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंचा प्रवेश सोहळ्यात फडणवीसांवर टीका:'काना मागून आला आणि तिखट झाला'; जयंत पाटलांचा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना टोला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असे वाटले होते. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे त्याच्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टोला लगावला आहे. ते म्हणाले की, भाजमध्ये खडसेंनी मोठे योगदान दिले आहे. मात्र काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'पक्षामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी काम केले. एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असे वाटले होते. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे त्याच्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसह पक्ष वाढवला आहे.' असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवले आहे. तसेच ते एक चांगले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची ताकद आम्ही पाहिलेली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कटप्पाने बाहुबली को क्यु मारा असा प्रश्न मी विचारला, पण आजही त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळाले असेल की टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है हे आता त्यांना कळेल.