आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:एकनाथ खडसे खोटे बोलतात, विनयभंगाचा खटला संपलेला नाही : अंजली दमानिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केला होता फोन : खडसे

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आपण विनयभंगाच्या खटल्यातून सुटलो असल्याचा दावा केला आहे. मात्र, खडसेंचा हा दावा खोटा आहे. या खटल्यातील प्रतिवादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी खुलासा केला. या खटल्यात आरोपपत्र अद्याप दाखल झाले नाही, मग विनयभंगाचा खटला संपला कसा? असा सवाल दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला.

फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केला होता फोन : खडसे
दमानिया प्रकरणात माझ्याविरोधात सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः फोन केला होता. याबद्दल मी तक्रार केल्यावर फडणवीस म्हणाले होते की, दमानिया तिथे गोंधळ घालत होत्या म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. याची तक्रार मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही केली होती, असा आरोप गुरुवारी खडसे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला.

राष्ट्रवादी पक्ष म्हणजे भ्रष्ट नेत्यांचे माहेरघर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व भ्रष्ट नेत्यांसाठीचे माहेरघर आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश आश्चर्यकारक नाही, अशी प्रतिक्रिया आम आदमीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केली.