आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:एकनाथ खडसे, शेट्टी यांची विधान परिषद हुकणार; महाविकास आघाडीतील नेत्यांचाच अंदाज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने केलेल्या १२ सदस्यांच्या शिफारशीतील २ ते ३ नावे वगळून इतर नावे राजभवनकडून मान्य होतील, असा अंदाज महाविकास आघाडीतच वर्तवला जात आहे. एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावांवर फुली बसण्याची दाट शक्यता आहे. मे-जूनपासून विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नामनियुक्त जागा रिक्त आहेत. सरकारने ६ नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे नियुक्त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी त्या मंजूर होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक कारणाने कोलदांडा : एकनाथ खडसे भाजपतून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते आहेत. राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते आहेत. या दोघांचा भाजप व देवेंद्र फडणवीस यांना कडवा विरोध आहे. त्यामुळे या दोघांची विधान परिषदेची वाट तांत्रिक कारण देऊन अडवली जाऊ शकते, अशी चर्चा आघाडीत आहे.

सहकार-समाजसेवेतून शिफारशी
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा व सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीची शिफारस सदस्यपदी करता येते. खडसे व शेट्टींच्या शिफारशी सहकार आणि समाजसेवाअंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. त्यावर राज्यपाल बोट ठेवू शकतात.

सहा शिफारशी राजकीय
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी ४ जागा वाटून घेतल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व राजू शेट्टी, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन अशा ६ शिफारशी राजकीय आहेत.

बातम्या आणखी आहेत...