आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे भूखंड घोटाळा:राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर; एका दिवसांपूर्वी जावई चौधरी यांना केली होती अटक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरेदीमुळे शासनाला 61 कोटींचा फटका

अंमलबजावणी संचालनालयाने पुणे जमीन घोटाळाप्रकरणी आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलावले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर झाले आहे. विशेष म्हणजे एकादिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली होती. आज दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे जावई दामाद गिरीश चौधरी हे विशेष पीएमएलए न्यायालयाच्या आदेशानंतर 12 जुलैपर्यंत ईडीच्या कस्टडीमध्ये आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चौधरी यांना मनी लॉन्ड्रिंग कायदा (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी रात्री अटक केली होती. दरम्यान, चौधरी हे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता.

खडसेंनी दोन वेळा टाळले, आज पुन्हा चौकशी
खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चाैकशी केली होती. गुरुवारी अाता खडसे अापली बाजू मांडणार अाहेत. यापूर्वी कोरोनाचे कारण पुढे करीत त्यांनी दाेन वेळा ईडी चाैकशीला जाण्याचे टाळले होते.

खरेदीमुळे शासनाला 61 कोटींचा फटका
पुणे जिल्ह्यात भोसरी तालुक्यातील हवेली गावातील एमआयडीचा सर्व्हे. 52-2ए-2 हा भूखंड बाजारभावापेक्षा स्वस्तात खरेदी केल्याचा अारोप अाहे. या प्रकरणात एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चाैधरी यांच्याविरोधात सन 2017 मध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याने गुन्हा दाखल केला होता. या खरेदीमुळे शासनाचे 61 कोटी 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अारोप अाहे.

31 कोटी बाजारमूल्य, 3.75 कोटीने खरेदी
अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडाचे बाजारमूल्य 31 कोटी रुपये असताना त्याची 3 कोटी 75 लाख रुपयांची रजिस्ट्री झाली होती. गिरीश चाैधरी यांनी इतरांच्या साथीने हा एमअायडीचा भूखंड प्रत्यक्ष किमतीपेक्षा अडीच ते तीनपट स्वस्तात खरेदी केला. ही खरेदी करण्यासाठी चाैधरी यांनी काही कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचे दाखवले. प्रत्यक्षात या कंपन्याच अस्तित्वात नव्हत्या अथवा शासकीय दप्तरात त्या बंद पडल्याची नोंद होती.

बातम्या आणखी आहेत...