आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जमीन घोटाळा:एकनाथ खडसे यांच्या जावायाची 5.73 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 86 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट केले फ्रीज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औद्योगिक जमीनी कमी दरात खरेदी केल्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या जावायाला मोठा धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची 5.73 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई काल 25 ऑगस्ट रोजी केली होती. परंतु, आज ईडीकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत पुष्टी केली आहे. ईडीने जुलै महिन्यात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गिरीश चौधरीला अटक केली होती. चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे 86 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट फ्रीज केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये लोणावळ्यातील बंगला आणि जळगावमधील मालमत्तेचा समावेश आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची याआधी जानेवारी आणि जुलै महिन्यांमध्ये दोन वेळा चौकशी केली होती.

औद्योगिक जमीनी कमी दरात खरेदी केल्याचा आरोप
एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसे 2016 मध्ये फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री होते. जमीन व्यवहार आणि इतर काही आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी परिसरातील एमआयडीसीची सरकारी जमीन कमी दरात खरेदी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

आरोपानुसार, ही जमीन गिरीश चौधरीच्या नावावर फक्त 3.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात याची किंमत अनेक पटीने जास्त होती. त्यामुळे या जमीन घोटाळ्यात मोठा भष्ट्राचार असल्याचे ईडीच्या लक्षात आले. यामुळे सरकारचा सुमारे 61 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

बातम्या आणखी आहेत...