आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सरकारी भूखंड खरेदीचे प्रकरण:एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात २०१६ मध्ये सरकारी भूखंड खरेदी केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन नाकारला. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद चौधरी यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या प्रकरणात विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनीही अगोदर जामीन नाकारला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात चौधरींसह इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले आहे. पुण्याजवळ भोसरी भागात सुमारे ३१ कोटी रुपयांचा भूखंड केवळ पावणेचार कोटींत खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे. हा व्यवहार झाला तेव्हा खडसे महसूलमंत्री होते. त्यांनी या काळात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ईडीने ठेवलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...