आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. मुंबईत महत्त्वाचे काम असल्याने दौरा रद्द करण्यात आला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करणार होते. यानंतर दुपारी साडे तीन वाजता शासकीय हेलिकॉप्टरने दरे, या त्यांच्या मुळगावी प्रयाण करणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौरा सुरू करण्याआधीच मराठवाड्यात मविआला धक्का दिला आहे. परभणी जिल्ह्यातील 30 लोकप्रतिनिधीसह औरंगाबाद जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाला धक्का देणार हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे.
असा होता दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील काळूबाईच्या या़त्रेस भेट देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या यात्रेसाठी जाणार असल्याची शक्यता होती.
शआधीही शिंदेंचा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 महिन्यापूर्वी देखील कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवाररांसह पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड केली गेली होती.
मविआ, रासप आणि एमआयएमला धक्का
परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.