आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी घणाघाती टीका बुधवारी ठाण्यात काढलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी केली. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असे खुले आव्हानच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या आव्हानावर आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
बोलण्याची गरज वाटत नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायचा अधिकार आहे. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचे कोणाला पाडायचे. मला त्यावर बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.
घरादारावर तुळशी पत्रक ठेवले
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना उभी करण्यात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. घरादारावर तुळशी पत्रक ठेवले. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आले. आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या त्यांच्यावर मी काय बोलणार? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावे, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार. गद्दारांच्या बद्दल लोकांच्या मनात संताप आहे, तो दिसून येतोय. मला प्रत्येक ठिकाणी लोक सांगताय तुमच्यासोबत आहे.
संबंधित वृत्त
शिंदेंनी ठाण्याला बदनाम केल्याचा आरोप
मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. तर शिंदेंनी ठाण्याला बदनाम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.