आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्र्यांना खोके म्हणणे, मिंधे म्हणणे, चोर-गद्दार म्हणणे हे कुठल्या आचारसंहितेत बसते नाना? असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खडे बोल सुनावले आहेत. आज विधानसभेत त्यांच्यात यावरुन चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधींच्या विधानावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांनी तीव्र गदारोळ निर्माण झाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी केली. खोके म्हणणे, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणे, मिंधे म्हणणे, चोर किंवा गद्दार म्हणणे हे कुठल्या आचारसंहितेत बसते नाना? असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. शिंदे म्हणाले की, आम्ही जोडे मारण्याचे समर्थन केले नाही, करणारही नाही. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणे हे देशद्रोहाचे काम आहे. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, नाना तुम्हाला वैयक्तिक घेण्याची गरज नाही. आपल्या देशाची किर्ती जगभरात पोहोचवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यामुळे पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही. लोकशाही धोक्यात आहे असे विरोधक म्हणाले तर भारत जोडो यात्रा कशी निघाली? असा सवाल सीएम शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
8 महिने आमच्याविरोधात घोषणाबाजी
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब तुम्ही बाहेर जाऊन देशाचा वारंवार अपमान करत असाल तर खपवून घेणार नाही. विधानभवन परिसरात 8 महिने आमच्याविरोधात घोषणाबाजी केली ते चालले का? असा सवाल शिंदेंनी विचारला. तसेच सगळ्यांवर समान कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि ते लगेचच कर्तव्यावर गेले. त्या पंतप्रधानांना तुम्ही चोर म्हणता अशाप्रकारची टीका यावेळी एकनाथ शिंदेंनी केली.
बोलताना तारतम्य बाळगा
याबद्दल पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगले पाहिजे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.