आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामलल्लांची आरती केल्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर आता सायंकाळी सात ते सव्वासातदरम्यान त्यांनी शरयूतीरी पूजन करून आरती केली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे बहुतांश आमदार उपस्थित होते.
LIVE
अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 40 आमदारांसह शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर दाखल झाले. लखनऊत पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिंदेसेनेचे जंगी स्वागत करण्यात आले.
देवेंद्र फडणवीसांचीही हजेरी
चंद्रपूरचे सागवान लाकूड मंदिराला अर्पण केले
अयोध्येतील राम मंदिराच्या खिडक्या आणि दरवाजांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सागवान लाकूड निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते लाकूड मंदिर व्यवस्थापनाला दिले. डेहराडूनस्थित राष्ट्रीय वन संशोधन संस्थेने राम मंदिर व्यवस्थापनाला चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड वापरण्याचा सल्ला दिला होता. हे लाकड 1000 वर्षे जुने आहे. तसेच, ते चमकदारही आहे.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आज अयोध्येसाठी लखनऊ विमानतळावरुन रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यंमत्री एकनाथ शिंदे प्रथम हनुमान गढीवर पूजा करतील. दुपारी राम मंदिरात महाआरती करतील. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे भाजप नेतेही अयोध्येत दाखल झाले आहेत. शिंदेसेनेसह ते राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील.
एकनाथ शिंदेंचा आजचा अयोध्या दौरा
हिंदुत्वावरुन ठाकरेंना शह देण्याच प्रयत्न
एकनाथ शिंदेंसह शिंदे सेना काल रात्री लखनऊ विमानतळावर येताच भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यामुळे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी हिंदुत्वावर ठोस दावा करण्यासाठी तसेच उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. शिंदे गट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
राम मंदिराची पाहणी
एकनाथ शिंदे आज दिवसभर अयोध्येत असणार आहे. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारचे अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत अयोध्येत पोहोचणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्याशी करणार चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. एकनाथ शिंदे रात्री नऊ वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यादरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी शिंदे करण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी विमानतळावरुन परतावे लागले - मंत्री शंभूराज देसाई
तत्पूर्वी, विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते रामदास कदम म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगले काम व्हावे म्हणून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आता चोर कोण ते लवकरच स्पष्ट होईल. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल. तर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मागच्या वर्षी विमानतळावरून आम्हाला माघारी परतावे लागले होते. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्याबाबत आग्रह केला होता.
हेही वाचा,
सलग दुसरा दिवस:अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले, बीड जिल्ह्यात गारपीट; हिंगोली, परभणीत वीज कोसळून 2 ठार
सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात शनिवारी जालना, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस व गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यात अंगावर वीज पडून शेतकरी तर परभणी जिल्ह्यात महिलेचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.